जॉब्स

MPSC MEDICAL BHARTI 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published by
Aadil Bagwan

MPSC MEDICAL BHARTI 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेडिकल पदाच्या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

MPSC MEDICAL BHARTI 2024 Details

जाहिरात क्रमांक: 052 ते 085/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा ग्रुप – A14
02.विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा ग्रुप – A75
03.जीव रसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा ग्रुप -B11
एकूण रिक्त जागा100 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता अर्ज करण्यापूर्वी एकदा नक्की तपासावी. त्यानंतरच आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 19 ते 50 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02: 19 ते 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03: 19 ते 38 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹719/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग: ₹449/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीपद क्रमांक 01 आणि 02: येथे क्लिक करा
पद क्रमांक 03: येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mpsc.gov.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan