MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्याशोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
वरील पदांसाठी BE/B.Tech in Civil Engineering असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज career@mrvc.gov.in या पत्त्यावर सादर करायचे आहेत तर या पदांसाठी वयोमर्यादा ही ४५ वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://mrvc.indianrailways.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-उमेदवारांनी अर्ज वर दलेल्या ईमेलद्वारे पाठवावेत, लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवणे दखल आवश्यक आहे. सोबत कागदपत्रे नसलेली अर्ज नाकारली जातील.
-अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.