Mumbai Bharti 2024 : मुंबई शिपिंग महासंचालनालय अंतर्गत नोकरीची मोठी संधी, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Bharti 2024 : नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. शिपिंग महासंचालनालय मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शिपिंग महासंचालनालय मुंबई अंतर्गत “शिपिंग उपमहासंचालक“ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 10 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, लक्षात घ्या देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवी तसेच प्रशासन/आस्थापना प्रकरणांमध्ये 10 वर्षांचा अनुभव असला पाहिजे, या भरतीसाठी अर्ज शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9वा मजला, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर व्हिलेज रोड, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई – 400 042 येथे पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार अधिकृत वेबसाईट https://www.dgshipping.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकतो.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत, इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर पाठवायचे आहेत, नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.