UIDAI Bharti 2024 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
या भरती अंतर्गत “सहाय्यक विभाग अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन मागवले जात असून, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने 22 मार्च 2024 पर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात.
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, आणि मगच आपले अर्ज, संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
उमेदवाराने “संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400 005” या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत.
यासाठी वयोमर्यादा 56 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत. तसेच अर्ज 22 मार्च 2024 पर्यंतच पाठवायचे आहेत, यापुढे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.uidai.gov.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावीत, अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.