Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!

Content Team
Published:
Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई’ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी 12 वी पास MBA, B.Sc.IT, B.C.A, उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

वरील भरतीसाठी वयोमर्यादा 21 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई ४०० ०९८ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवार अर्ज 29 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकतात.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 43,200/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-लक्षात घ्या अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारली जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे .

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe