जॉब्स

NABARD Recruitment 2024: 10 वी पास उमेदवारांना नाबार्डमध्ये 35 हजार रुपये पगार मिळवण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

NABARD Recruitment 2024:- तुम्ही देखील दहावी पास आहात परंतु सरकारी नोकरीची अपेक्षा तुम्हाला आहे व त्यासंबंधीची तयारी तुम्ही करत आहात तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी असून नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

त्यामुळे तुम्ही देखील दहावी पास असाल तर तुम्हाला नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. नाबार्डच्या माध्यमातून ग्रुप सी ऑफिस अटेंडंटच्या 108 रिक्त पदांसाठी भरती बाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीकरिता जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

 किती लागेल शैक्षणिक पात्रता?

नाबार्डच्या माध्यमातून ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे व याकरिता उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रते संदर्भात डिटेल्स  माहिती हवी असेल तर या भरतीची अधिकृत जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

 किती लागेल वयोमर्यादा?

नाबार्डच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या या भरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील त्यांना वयामध्ये विशेष सवलत मिळणार आहे.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

नाबार्डच्या माध्यमातून ऑफिस अटेंडंट पदासाठी राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना 35 हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.

 किती लागेल अर्ज

शुल्क?

या भरतीसाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे. याकरिता सामान्य तसेच ओबीसी आणि ईडब्ल्यूएस शाळेतील उमेदवारांना 450 रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे तर एससी/ एसटी आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना फक्त पन्नास रुपये शुल्क भरावे लागेल.

 काय आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत?

नाबार्डच्या माध्यमातून 108 ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून याकरिता उमेदवारांना 2 ऑक्टोबर पासून अर्ज करता येणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.

 अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट कोणती?

या भरतीसाठी ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते https://www.nabard.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil