जॉब्स

NABFID Bharti 2024 : बँकेत काम करण्याची उत्तम संधी; पदवीधर असाल तर येथे सुरु आहे भरती…

Published by
Renuka Pawar

NABFID Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन ई-मेलद्वारे आपले अर्ज सादर करू शकता.

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत “उपाध्यक्ष, मुख्य अर्थतज्ज्ञ” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी वर दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची काळजी घ्या.

उपाध्यक्ष, मुख्य अर्थतज्ज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. या भरती साठी वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे, या पुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

इच्छुक उमेदवार recruitment@nabfid.org. या ईमेलद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात, लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.nabfid.org/ ला भेट देऊ शकता.

अर्ज कसा सादर करू शकता?

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज ईमेलद्वारे सादर करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar