Nagar Jilha Bank Bharati : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पावन पर्व मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. याचं आनंदमयी वातावरणात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीची वाट पाहिली जात होती. अखेर कार या पदभरतीची आता घोषणा करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेने जिल्हा सहकारी बँकेत नोकर भरती राबवली जाणार आहे. यासाठी उद्यापासून अर्थातच 13 सप्टेंबर 24 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
खरे तर या भरती बाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र ही भरती जाहिर होत नव्हती. यामुळे तरुणांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत होती. मात्र, आता जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेतील विविध पदांच्या 700 रिक्त जागा भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरती अंतर्गत कोणकोणती रिक्त पदे भरली जातील, निवड प्रक्रिया कशी असेल, या पदासाठी नियुक्त होणाऱ्यांना किती पगार मिळणार? यासंदर्भात आता आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेतील लिपिक, वाहनचालक, सुरक्षारक्षक या पदाच्या रिक्त जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
कोणत्या पदाच्या किती जागा भरल्या जाणार?
लिपिक : 687
वाहन चालक : 4
सुरक्षा रक्षक : 5 जागा
शैक्षणिक पात्रता
क्लर्क अर्थात लिपिक पदासाठी बी. कॉम, एमबीए (बँकिंग, फायनान्स) एलएबी, एलएसएम, डीएलटीसी यासह वाणिज्य विभागातील शिक्षणाची अट आहे. बँकिंग सेक्टरमध्ये तीन वर्षांच्या कामाच्या अनुभवाची अट सुद्धा लावून देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
सुरूवातीच्या वर्षभर या पदभरती अंतर्गत लिपिक पदावर नियुक्त होणाऱ्या लोकांना 15 हजार रुपये दिले जातील. तसेच वाहन चालक व सुरक्षा रक्षक यांना सुरुवातीला एक वर्ष 12 हजार रुपये पगारावर नोकरीं करावी लागणार आहे. जेव्हा नियुक्त झालेले उमेदवार एक वर्षाचा परिविक्षाधिन कालावधी पूर्ण करतील तेव्हा ते बँकेच्या सेवत येणार आहेत.
निवड कशी होणार
या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. या ऑनलाइन लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर दहा गुणांची तोंडी परीक्षा अर्थात मुलाखत घेतली जाईल. निवड यादीत नाव आल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल. यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना या पदांसाठी नियुक्त केले जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. उद्यापासून अर्थातच 13 सप्टेंबर पासून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतील आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2024 राहणार आहे. या विहित मुदतीतच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही सबबीवर अर्ज सादर करता येणार नाही.