NCCS Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत, ही भरती पुण्यात होत असून, येथील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “वैद्यकीय सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकराले जाणार नाहीत.
वैद्यकीय सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे MBBS Degree असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. 60 वर्षावरील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
वरील भरतीसाठी अर्ज संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एस.पी. पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे – 411007 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत, तसेच या भरतीविषयी आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://nccs.res.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावरच पाठवायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज 02 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात
सविस्तर वाचा.