Categories: जॉब्स

एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी,पगारही असेल आकर्षक जाणून घ्या सविस्तर माहिती…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

देशात कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अनेक उद्योग, क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग मिळेल. पगारही आकर्षक असेल, असे सांगितले जात आहे.

पदांची माहिती :- 

  • मॅनेजर (फायनान्स) – ४ पदे
  • ऑफिसर (अकाउंट्स) – ७ पद
  • असिस्टंट (अकाउंट्स) – ४ पदे
  • एकूण पदांची संख्या – १५ पदे

पे-स्केल :- 

  • मॅनेजर – ५० हजार रुपये मासिक
  • ऑफिसर – ३२,२०० रुपये मासिक
  • असिस्टंट – २१,३०० रुपये मासिक

पात्रता :-  सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंट पर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशन मध्ये दिले आहे.

एयर इंडियाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमच्याद्वारे जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करून आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढा. ते भरून सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडी hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा.

ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे अटॅच करा. अर्जांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०२१ आहे.

Air India Job Notification 2021 आणि Application Form साठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://www.airindia.in/writereaddata/Portal/career/937_1_AIASL-ADVT.pdf

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24