जॉब्स

पोलीस व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ महिन्यात पुन्हा निघणार 7,500 पदांसाठी पोलीस भरती, तारखा पहा..

Published by
Tejas B Shelar

Police Bharati : आपलं पोरग पोलिसात असावं असं स्वप्न हजारो पालकांचे आहे. मुलं देखील खाकी वर्दी मिळवण्यासाठी जीवाचं रान करतात. यासाठी कसून सराव करतात. सोळाशे मीटरचे ग्राउंड जोवर निघत नाही तोवर मुलांचा सराव सुरूच असतो. दरम्यान पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा एक मोठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया डिसेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे जर तुम्हीही पोलीस भरतीसाठी ट्राय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर, राज्यात गेल्या दोन वर्षांच्या काळात 35 हजार पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या पोलीस भरती प्रक्रियेमुळे हजारो युवकांचे आणि युवतींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण, तरीही गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या भरतीत जर तुम्हाला यश मिळाले नसेल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

डिसेंबर मध्ये होणाऱ्या साडेसात हजार पदांसाठीच्या भरतीमुळे तुम्हाला खाकी वर्दी मिळवण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. यासाठी मात्र तुम्हाला आत्तापासूनच सराव सुरु करावा लागणार आहे. आतापासूनच कसून सराव केला तर तुम्हाला नक्कीच आगामी भरतीत यश मिळणार आहे.

मुंबई पोलीस दलातील बाराशे पदांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर मध्ये होणाऱ्या साडेसात हजार पदांसाठीच्या भरतीमध्ये मुंबईतील बाराशे पदांचा देखील समावेश राहणार आहे. आगामी भरतीत मुंबई पोलीस दलातील बाराशे पदांचा समावेश राहणार अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

म्हणजे ज्यांचे मुंबई पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न असेल त्यांचे हे स्वप्न देखील पुढील भरतीमुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे. खरेतर, कोरोना काळात जवळपास तीन वर्षे भरती रखडली होती. मात्र गेल्या दोन वर्षात 35 हजार पदांसाठी भरती झाली आहे.

पहिल्या वर्षी 18000 आणि दुसऱ्या वर्षी 17000 अशा सलग दोन वर्षात 35 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

त्यावेळी लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागानं सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक, शिपाई आणि पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत.

उर्वरित जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सध्याची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग नवीन पोलीस भरती जाहीर होणार आहे. डिसेंबर मध्ये यासाठीची जाहिरात निघू शकते असा दावा केला जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com