Pune Bharti 2024 : डॉ. डी.वाय. पाटील पुणे विद्यापीठात भरती सुरु, थेट ई-मेल द्वारे करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2024 : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, हे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने करायचे असून, उमेदवारांनी देय तारखे पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल.

डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत “संचालक (विद्यार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), डेप्युटी सीईओ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

या भरतीसाठी पीएच.डी. पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, उमेदवारांनी पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन (ई-मेल) अर्ज या career@dpu.edu.in ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहेत.

तर ऑफलाईन अर्ज कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – 411 018 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरती संबंधित उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार https://dpu.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

असा करा अर्ज

-अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.