Pune Cantonment Board Bharti 2023 : सरकारी विभागात नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी पुण्यात एक संधी चालून आली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा.
कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे द्वारे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता नोंदणीसाठी आमंत्रित केले गेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीमध्ये सहभाग नोंदवावा. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी. या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा…
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
भरती विभाग
ही भरती कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत सुरु आहे.
भरती श्रेणी
ही भरती केंद्र सरकारद्वारे केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी, आणि मगच मुलाखतीस हजर राहावे.
मासिक वेतन
भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे. दरमहा उमेदवारांना 40,000 ते 75,000 रूपये दरम्यान मासिक वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा
येथे 55 वर्षे पर्यंत ज्या उमेदवारांचे वय आहे, त्यांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज पद्धती
ऑफलाईन ( मुलाखत प्रक्रिया आहे.) आहे.
भरती कालावधी
ही भरती कंत्राटी तत्वावर होत आहे.
पदाचे नाव आणि रिक्त जागा
या भरती अंतर्गत रेडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर. गुरुद्वारा, देहूरोड, पुणे – ४१२१०१. येथे मुलाखतीस हजर राहू शकतात.
लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
मुलाखतीची वेळ
उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांच्या मूळ आणि साक्षांकित प्रतींसह सकाळी 10:00 पूर्वी मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे.
मुलाखत दिनांक
मुलाखतीसाठी उमेवारांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी हजर राहायचे आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार https://pune.cantt.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.