Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात सुरु आहे भरती, ‘प्राध्यापक’ पदांसाठी होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात सध्या सुरु असलेल्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी हे अर्ज मागवले जात आहेत, येथे होणाऱ्या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, जाणून घेऊया…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “रजिस्ट्रार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 अशी आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर करायचे आहेत.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही विषयात मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे, तरी उमेदवारांनी आपले अर्ज https://admin.unipune.ac.in/recruitment/ ला लिंकद्वारे सादर करायचे आहेत, अर्जानुसार उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरती साठी 45 वर्षाच्या आतील उमेदवारांनीच अर्ज सादर करावेत.

अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे देखील आवश्यक आहे, हे शुल्क 400/- रुपये आहेत, जे उमेदवार आज शुल्क भरणार नाहीत, त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे थेट पाठवायचा आहे.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी अर्ज करण्यापूर्वी ते वाचून घ्या.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. तसेच, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना एकदा काळजीपूर्वक वाचा.