जॉब्स

10 वी,12 वीनंतर डिग्री, डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचे असेल तर ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार! तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली लिस्ट

Published by
Ajay Patil

आता येणाऱ्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील व लागलीच शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध अभ्यासक्रमांच्या ऍडमिशन करिता पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू होईल. दहावी व बारावीच्या निकालानंतर अनेक जण विविध प्रकारचे डिप्लोमा अर्थात पदविका आणि डिग्री म्हणजेच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असतात

परंतु आता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर याची प्रक्रिया देखील सुरू होईल. परंतु बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा आपण अशा डिग्री किंवा डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायला जातो तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात व त्यातील प्रमुख समस्या उद्भवते ती म्हणजे कागदपत्रांची कमतरता ही होय.

कारण नेमके ऍडमिशन घेण्याच्या वेळेला आपल्याकडे एखादे कागदपत्र कमी असते व ते कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अगदी वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागते व अशा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे कधी कधी ऍडमिशन देखील हातातून जाते.

त्यामुळे होणारी ही गैरसोय टाळावी याकरिता तंत्र शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांचा एक तपशील जारी करण्यात आलेला आहे. त्या तपशीलानुसार आता विद्यार्थ्यांनी त्यांचे आरक्षण व पात्रता यानुसार कागदपत्रे तयार ठेवून प्रवेश प्रक्रिये दरम्यान ते सादर करणे गरजेचे राहणार आहे.

विविध डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमांच्या ॲडमिशनसाठी ही कागदपत्रे ठेवा तयार

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली असणारे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष वास्तुकला, औषध निर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट या शाखातील पदविका व पदवी अभ्यासक्रम व पदवी स्तरावरील बी. डिझाईन,

बीबीए, बीसीए इत्यादी पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर पदवी स्तरावरील एम टेक, औषध निर्माण शास्त्र( एम फार्म व डी फार्म), एम. आर्किटेक्चर, एम, प्लॅनिंग, हॉटेल मॅनेजमेंट तसेच एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांकरिता आवश्यक असलेले कागदपत्रांचा तपशील जारी करण्यात आलेला आहे व त्यानुसार….

 आवश्यक कागदपत्रांची यादी

1- विद्यार्थ्याचे जात/ जमात प्रमाणपत्र

2- विद्यार्थ्यांचे जात/ जमात व्हॅलिडीटी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडीटी

3- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती व्यतिरिक्त आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असलेले नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट

4- नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

5- इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला

6- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र

7- दिव्यांग विद्यार्थी असतील तर दिव्यांग बाबतची आवश्यक प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रे यामध्ये महत्त्वाचे राहणार आहेत.

 याकडे लक्ष द्या

2016-17 या शैक्षणिक वर्षांमध्ये अनेक उमेदवारांनी बनावट स्वरूपाची कागदपत्रे सादर केली होती व ऍडमिशन घेतले होते. अशा विद्यार्थ्यांवर त्यावेळी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती व त्यांचे प्रवेश देखील रद्द करण्यात आलेले होते. अगदी त्याच पद्धतीने सक्षम प्राधिकरणाकडून कागदपत्रे प्राप्त न करून घेता बनावट कागदपत्रे सादर केले तर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल व प्रवेश देखील रद्द ठरवले जातील असे देखील यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil