Bank Recruitment 2024:- सध्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून काही भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे आणि नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांकरिता हा कालावधी एक सुवर्णसंधी आहे.
संरक्षण क्षेत्र तसेच बँकिंग, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये देखील भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता नुकतीच पोलीस भरती देखील जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीची देखील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
याचप्रमाणे जे उमेदवार बँकेच्या परीक्षांची किंवा बँकेत नोकरी करण्याच्या संधीची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची स्वर्णसंधी चालून आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून ही भरती तब्बल 3000 रिक्त जागांकरिता घेण्यात येणार आहे.
सेंट्रल बँकेमध्ये 3000 रिक्त जागांसाठी भरती
1- पदाचे नाव– सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदाकरिता हे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून ज्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार या पदाकरिता अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
2- किती पदांसाठी होणार आहे भरती?- सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने शिकाऊ उमेदवार या पदाच्या 3000 रिक्त जागांकरिता घेण्यात येणार आहे.
3- आवश्यक शैक्षणिक पात्रता– या भरतीसाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.
4- अर्ज करण्याची पद्धत– सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. त्याकरता उमेदवारांना https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
5- अर्ज करण्याची शेवटची तारीख– भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 इतकी आहे. यापूर्वी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
6- निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?- या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना 15 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.
7- आवश्यक वयोमर्यादा– या भरती करिता आवश्यक वयोमर्यादा ही किमान 20 ते कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे.
8-अधिकच्या माहितीसाठी कुठे करावा संपर्क?- या भरती विषयी अधिकची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर घेऊ शकतात.