PCMC Fire Vacancy 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, या भरती अंतर्गत विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल आणि येथे काम करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
या भरती अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
-माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन त्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
-एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
-मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 33 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2024 पासून सुरु होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी उमेदवर 26 एप्रिल पासून 17 मे पर्यंत अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करावेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2024 पासून सुरु होत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.