जॉब्स

TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई येथे मॅनेजर पदांसाठी सुरु आहे भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी !

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Institute of Social Sciences Mumbai : जर तुम्ही मुंबईत आहात आणि एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “सीनियर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क इंजिनीअर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 अशी आहे.

वरील भरती अंतर्गत बॅचलर किंवा मास्टर डिग्री असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, तरी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून, आपले अर्ज पाठवावेत. ऑनलाईन अर्ज, सीनियर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर पदांसाठी https://recruitment.tiss.edu/ या लिंकद्वारे सादर करायचा आहे, तर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क इंजिनीअर पदासाठी https://recruitment.tiss.edu/ या लिंकचा वापर करायचा आहे.

लक्षात घ्या वरील भरतीसाठी अर्ज शुल्क देखील भरायचे आहेत, अर्ज शुल्क 500/- रुपये असणार आहेत, जे उमेदवार अर्ज शुल्क भरणार नाहीत, त्यांचा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://tiss.edu/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासून, सादर करावेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असून देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.

-तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय आलेले अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील. याची नोंद घ्या.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office