Mumbai Bharti 2024 : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरु, आजच पाठवा अर्ज…

Content Team
Published:
Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

वरील भरती अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ, असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ह सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत होत आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 21 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज के.एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई. या पत्त्यावर पाठवायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.cife.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe