Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी काही दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या भरतीसाठी किती आणि कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत ते पुढीलप्रमाणे :-
वरील पदासाठी “चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 07 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे.
वरील पदासाठी MD Medicine, DNB उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांनी मुलाखतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://thanecity.gov.in/
ला भेट द्या.निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. मुलाखत 07 मार्च 2024 रोजी होणार असून, उमेदवारांनी वेळेत मुलाखतीस हजर राहायचे आहे.
-अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.