MPSC Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तर उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत पाहूया…
वरील भरती अंतर्गत “समाज कल्याण अधिकारी, गट-ब” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून. अर्ज प्रक्रिया 24 मे 2024 पासून सुरु होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती महाराष्ट्रात होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज प्रक्रिया 24 मे 2024 पासून सुरु होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
तर अर्ज 07 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी लिंक 24 मे 2024 पासून सुरु होईल.
-तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024आहे. तरी देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.