Mumbai Port Trust Bharti : मुंबईतील पोस्ट ट्रस्ट मध्ये रिक्त जागांसाठी निघाली भरती; अर्ज पद्धत जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा…

Content Team
Published:
Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहे पाहूया…

वरील भरती अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. उमेवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी 10 वी पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 100/- रुपये इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mumbaiport.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

-अर्ज फक्त संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.

-अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून, अर्ज अंतिम तारीखे अगोदर सादर करावेत.

-उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

 PDF जाहिरात I

PDF जाहिरात II

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe