ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “GDMO“ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15 मे 2024 रोजी संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? जाणून घ्या…
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS आहे.
वयोमर्यादा
वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690, बिबवेवाडी, पुणे-37 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 15 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.esic.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि अर्जासह उपस्थित राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 15 मे 2024 असून उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहावे.
-मुलखतीपूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
आवश्यक कागदपत्रे
वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास NOC, संस्था/संस्था, दोन फोटो.