Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेजमध्ये ‘प्राचार्य’ पदांची भरती सुरु, ईमेद्वारे करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा.

आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “प्राचार्य” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

यासाठी अर्जदाराला UGC, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी विहित केलेल्या प्राचार्यांच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता/पात्रता निकष लागू होतील.

यासाठी ऑनलाईन (ई-मेल) अर्ज armylawcollegepune@gmail.com या ई-मेल पत्त्यावर सादर करायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://alcpune.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज दिलेल्या ईमेद्वारेच सादर करायचे आहेत..

-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. वर दिलेल्या तारखे अगोदरच आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-अजासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना वाचावी.