Maharashtra State Security Corporation Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत संध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “कार्यालयीन सहाय्यक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जदारांनी लक्षात घ्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेचे आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
नोकरी ठिकाण
ही भरती महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ३५ वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
पात्र उमेदवार पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५. या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहू शकतात.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mssc.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-इच्छूक व पात्र उमेदवार https://forms.gle/VMHoskZcBCDPKSD46 या लिंकवर जाऊन आपले अर्ज सादर करू शकतात.
-तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या ई – मेल आयडी वर पाठवावेत.
-येथे अर्ज सादर करण्याची शेवटची 25 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे महत्वाचे आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलवले जाईल.
-निवड झालेल्या उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
-मुलाखतीची माहिती उमेदवारांना इमेल किंवा फोन द्वारे कळवली जाईल.
-मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.