Categories: जॉब्स

BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड!

Published by
Ahmednagarlive24 Office

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, एसए/बी (रेडिओग्राफी), एसए/बी [पॅथॉलॉजी], सीएसएसडी तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतीकरिता उमेदवारांनी 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

वरील भरती साठी12 वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. यासाठी पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. फार्मासिस्ट पदासाठी 45 वर्षे तर इतर पदांसाठी 40 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

वरील भरतीसाठी कॉन्फरन्स रूम क्र.2 ग्रा. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई ४०० ०९४ या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.barc.gov.in/ ला भेट देऊ शकता.

निवड प्रक्रिया :-

-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होणार आहे.
-मुलाखतीची तारीख 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
-उमेदवारांनी मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

PDF जाहिरात 1

 PDF जाहिरात 2

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office