Nagar Vikas Vibhag Mumbai : नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु, अर्जप्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी…

Content Team
Published:
Nagar Vikas Vibhag Mumbai

Nagar Vikas Vibhag Mumbai : नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट” पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी अर्ज प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://urban.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तरी उमेदवारांचा अर्ज पूर्ण भरलेला असावा.

-अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe