MahaGenco Bharti : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असाल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा.
वरील भरती अंतर्गत “DGM (वित्त/लेखा), उप. व्यवस्थापक (फिन/खाते), व्यवस्थापक (प्रकल्प), व्यवस्थापक (एचआर), उप. व्यवस्थापक (प्रकल्प) आणि LDC किंवा UDC” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 57 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज मुंबई, Dy. महाव्यवस्थापक (HR-RC/DC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई -400 019 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mahagenco.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.