ESIC Pune Bharti 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु आहे भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Pune Bharti 2024 : जर तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर तुमच्या ही बातमी महत्वाची आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती करिता उमेदवारांसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत “पूर्णवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2024 असून, खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी हजर राहायचे आहे.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असेल. वरिष्ठ निवासी पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्पेशॅलिटीमध्ये पीजी पदवी किंवा समतुल्य / पीजी डिप्लोमा असलेला एमबीबीएस असावा, तर पूर्णवेळ विशेषज्ञपदासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस डिग्री असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे ते ६७ वर्षे इतकी आहे, या नंतरचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

ही भरती पुण्यात होत असून, उमेदवारांनी, कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे-३७ या पत्त्यावर हजर राहायचे आहे. लक्षात घ्या मुलाखत 29 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/ ला भेट देऊ शकता.

निवड प्रक्रिया :-

-वरील भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

आवश्यक कागदपत्रे :-

-वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र.
-शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
-MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
-नोंदणीचे नूतनीकरण
-जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
-अनुभव प्रमाणपत्रे.
-आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास NOC. संस्था
-दोन छायाचित्रे (PP आकार)