Mahavitaran vidyut sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत सध्या मोठी भरती निघाली आहे, यासाठी उमेदरांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत, उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी २० मार्च २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी १० वी ते १२ वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
वयोमर्यादा ही १८ ते २७ वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत.
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० + GST, मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST असे शुल्क आहेत.
अर्ज पद्धती
वरील भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी https://www.mahadiscom.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज संबंधित सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
-या भरतीसाठी अर्ज २० मार्च २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत. लक्षात घ्या उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.