Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Aadil Bagwan
Published:
SAMAJ KALYAN VIBHAG BHARTI 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण पुणे विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.उच्च श्रेणी लघुलेखक10
02.गृहपाल / अधीक्षक (महिला)92
03.गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण)61
04.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
05.निम्न श्रेणी लघुलेखक03
06.समाज कल्याण निरीक्षक39
07.लघु टंकलेखक09
एकूण रिक्त जागा219 जागा
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.01:

  • दहावी उत्तीर्ण
  • इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र. मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.
  • MS – CIT किंवा समतुल्य

पद क्र.02, 03 आणि 04:

  • कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
  • MS – CIT किंवा समतुल्य

पद क्र. 05:

  • दहावी उत्तीर्ण
  • इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र. मि. किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र. मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.
  • MS – CIT किंवा समतुल्य

पद क्र. 06:

  • कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
  • MS – CIT किंवा समतुल्य

पद क्र. 07:

  • दहावी उत्तीर्ण
  • लघुलेखन 80 श.प्र. मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

पुणे, महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1,000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://sjsa.maharashtra.gov.in/
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe