Sancheti Hospital Bharti 2024 : पुणे संचेती हॉस्पिटल अंतर्गत ‘या’ पदांकरिता भरती सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sancheti Hospital Bharti 2024 : पुण्यातील संचेती हॉस्पिटल मध्ये सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.  या भरती अंतर्गत प्राध्यापक सह प्राचार्य पदांच्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

संचेती हॉस्पिटल पुणे अंतर्गत “प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचावी. ही भरती पुण्यात होत असून, अर्ज संचालक, संचेती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, शिवाजी नगर, पुणे – 411005 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

लक्षात घ्या इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://sanchetihospital.org/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.