जॉब्स

SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत मेगा भरती सुरू; लिपिक पदाच्या 13,735 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज

Published by
Aadil Bagwan

SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँक अंतर्गत “लिपिक पदाच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. स्टेट बँक अंतर्गत ही भरती तब्बल 13735 रिक्त जागा भरण्यासाठी राबवली जात आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

SBI Clerk Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक: CRPD/CR/2024-25/24

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.जूनियर असोसिएट [(लिपिक) कस्टमर सपोर्ट अँड सेल्स ]13,735
एकूण रिक्त जागा13,735

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांच्याकडून खालील प्रमाणे अर्ज शुल्क आकारला जाईल-

  • जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस: ₹50/-
  • एस सी / एसटी / पीडब्ल्यूडी / ExSM: यांना फी नाही.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वासावी त्यानंतरच अर्ज करावा
  • ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://bank.sbi/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan