Success Story:- कुठलेही यश बघितले तर आपल्याला सहजासहजी कधीच मिळत नसते. भलेच आपल्याकडे लागणाऱ्या सर्व गोष्टी असल्या तरी यशासाठी आपल्याला सतत कष्ट करावे लागतात व आलेल्या समस्यांची झगडत राहून, दोन हात करत त्यावर मात करून पुढे जाणे गरजेचे असते.
एवढेच नाहीतर जोपर्यंत आपल्याला ध्येय गाठता येत नाही तोपर्यंत न थांबता योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे असते. तेव्हा कुठे व्यक्तीला यश मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे यश हे एका रात्रीत किंवा एका महिन्यात कधीच मिळत नाही. त्याकरता तुम्हाला दीर्घ कालावधीपर्यंत कष्ट करणे गरजेचे असते.
हाच मुद्दा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील असलेल्या सिमरन थोरात या कन्येचे घेता येईल. सिमरन यांना आई-वडिलांनी खूप कष्ट करून शिकवले. परंतु सिमरन यांनी देखील आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान मिळवला.
सिमरन थोरात बनली पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर
बाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्या गावांमध्ये सिमरन यांचा जन्म झाला व अगदी लहानपणापासून त्यांना समुद्राच्या लाटा व त्यावर स्वार होण्याचे एक स्वप्न होते.परंतु हे स्वप्न पूर्ण करणे सिमरनसाठी नक्की सोपे नव्हते. सिमरन थोरात यांचे मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचे स्वप्न होते.
परंतु ते स्वप्न पूर्ण करणे नक्कीच सोपे नव्हते. त्यातल्या त्यात सिमरन थोरात यांची घरची परिस्थिती बघितली तर ती खूपच बेताची व आर्थिक हालाखीची होती. त्यातल्या त्यात स्वप्न मर्चंट नेव्हीत जॉईन होण्याचे पाहिलेले होते व याची शिक्षणासाठी जवळपास नऊ लाखाच्या पुढे खर्च होता.
कारण त्याकरिता तीन वर्षाचा कोर्स करणे गरजेचे असते. त्यासोबतच इतर खर्च हे होते. परंतु सिमरन थोरात यांचे वडील त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते व काही करून मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे हे त्यांनी मनाशी ठाम केलेले होते. मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापाने त्यांच्याकडे शेती होती तेवढी विकून टाकली व मुलीला पैसा पुरवला.
त्यानंतर उदरनिर्वासाठी मात्र सिमरन यांच्या आईने एका फॅक्टरीमध्ये तर वडिलांनी इलेक्ट्रिशियन चे काम सुरू केले. मुलीला लागेल तेवढा पैसा पुरवला व सिमरन थोरात यांनी देखील आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान मिळवला.
सिमरन यांना इंग्रजी भाषेचा आला मोठा अडथळा
या सगळ्या प्रवासाबद्दल बोलताना सिमरन सांगतात की, शिक्षणामध्ये जी काही पैशांची अडचण आली ती आई वडिलांनी दूर केली.मात्र शिक्षण सुरू असताना काही भाषेशी संबंधित अनेक अडचणी आल्या. कारण सिमरनचे शिक्षण हे मराठी आणि नंतर सेमी इंग्रजीमध्ये झालेले होते आणि मर्चंट नेव्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत असतो.
त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी अनेक आव्हाने उभी ठाकली. कारण इंग्रजी चांगली नसल्यामुळे एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. पहिल्याच प्रयत्नात निराशा पदरी पडल्याने त्यांनी निराशेतून स्वतःला सावरले व आणखी कष्ट करण्याचा निर्णय घेतला.
इंग्रजीचा सराव करता यावा याकरिता सिमरन भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागली तसेच आरशासमोर उभे राहून तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला. तसे पाहायला गेले तर सिमरन या त्यांच्या बॅचमधील गुणवत्ताधारक विद्यार्थिनी होत्या परंतु इंग्रजीची अडचण होती.
परंतु इंग्रजीचा अखंड सराव केल्यामुळे यावर देखील मात मिळवली व शेवटच्या वर्षात सिस्पन कंपनी प्लेसमेंटसाठी आली व कंपनीने सिमरन थोरात यांची महिला डेक कॅडेट म्हणून निवड केली व अशा पद्धतीने सिमरन थोरात यांनी पुणे जिल्ह्यातील पहिली महिला मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्याचा बहुमान पटकावला.
सिमरन थोरात यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की, तर तुमची कष्ट करण्याची ताकद असेल व प्रयत्न करण्याचे सातत्य असेल व काही करून ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द असेल तर तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवता येते.