जॉब्स

10 वी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना एसटी महामंडळात नोकरीची मोठी संधी! ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Published by
Ajay Patil

विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता आता अनेक शासकीय विभागाअंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आले आहेत व यासोबतच विविध बँक तसेच पोस्ट ऑफिस, रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा करून घेण्याचा हा कालावधी असून अगदी दहावी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना आता नोकरीच्या सुवर्णसंधी आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून बघितले तर एसटी महामंडळाच्या माध्यमातून देखील धुळे जिल्हा अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे व विशेष म्हणजे याकरिताची जाहिरात देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाच्या धुळे जिल्हा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये दहावी व आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

 एसटी महामंडळ धुळे जिल्हा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी महामंडळाच्या धुळे जिल्हा अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून याकरिता आवश्यक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

 कोणत्या पदांच्या किती आहेत रिक्त जागा?

एसटी महामंडळ धुळे जिल्हा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारांचे एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत व यामध्ये मोटर मेकॅनिक, 65 जागा, डिझेल मेकॅनिक 64 जागा, शीट मेटल वर्कर 28 जागा, वेल्डर 15 जागा, इलेक्ट्रिशियन 80 जागा, टर्नर दोन जागा, मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनियर/ डिप्लोम्याच्या दोन जागा भरले जाणार आहेत.

 या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

या रिक्त पदांपैकी मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन आणि टर्नर या पदांसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व त्यासोबतच मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे आहे.

 किती लागेल अर्ज शुल्क?

एसटी महामंडळ धुळे जिल्हा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.

 अर्ज कुठे पाठवायचे आहेत?

एसटी महामंडळ धुळे जिल्हा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज हे विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे-424001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तसेच अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

त्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जून 2024 आहे व या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे.

 महत्वाचे

एसटी महामंडळ धुळे जिल्हा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना धुळे येथे नोकरी मिळेल.

Ajay Patil