महाराष्ट्र मध्ये बारावीचे निकाल लागले व आता त्यानंतर मात्र महत्त्वाच्या अशा अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन घेण्याकरिता पालकांची धावपळ होताना आपल्याला दिसून येईल. कारण करिअरच्या दृष्टिकोनातून बारावी हे वर्ष खूप महत्त्वाचे समजले जाते व त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला जातो तो संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा असतो.
त्यामुळे बारावीनंतर तुम्ही कुठला अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात यावर सगळे करिअर अवलंबून असल्याने खूप सावधगिरीने असा निर्णय या वेळेस घ्यावा लागतो. कारण बारावीनंतर नेमके काय करायचे याबाबतचा मोठा संभ्रम विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येतो.
जर आपण कोर्सेस पाहिले तर त्यांची संख्या मोठी असते व यामधून कोणता कोर्सेसची निवड करावी हे आपल्याला समजत नाही. यामुळे आपण या लेखामध्ये अशा काही कम्प्युटर सायन्सशी निगडित असलेल्या कोर्सेसची माहिती घेणार आहोत जे पूर्ण केल्यानंतर लाखो रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्या अगदी सुरुवातीला मिळणे शक्य आहे.
बारावीनंतर करा आहे कम्प्युटर सायन्सचे टॉप कोर्स
1- बॅचलर ऑफ इंजीनियरिंग इन कम्प्युटर सायन्स– यामध्ये बीई हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टम शिकवली जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनिअर किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर अशा पदांवर हा कोर्स केलेल्या उमेदवाराला नोकरी मिळते व सुरुवातीलाच अगदी वार्षिक चार ते आठ लाख रुपयांची पॅकेज मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतात.
2- बीएससी इन
कम्प्युटर सायन्स– बीएससी इन कॉम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून पदवीधरांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा अनालिस्ट म्हणून म्हणून काम करणाऱ्या वेब डेव्हलपर्स वर्षाला तीन ते सहा लाख रुपयांचे पॅकेज कमवतात. हा कोर्स केल्यानंतर आयटी आणि संशोधन क्षेत्रामध्ये मोठी संधी उपलब्ध होते.3- बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी– आयटीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकास तसेच संगणक प्रणाली आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. या माध्यमातून नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून यामध्ये पदवीधरांना वार्षिक 4 ते 9 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच फायनान्स आणि सरकारी क्षेत्रामध्ये हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
4- बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन म्हणजेच बीसीए– या अभ्यासक्रमामध्ये कंप्यूटर एप्लीकेशन आणि प्रोग्रामिंग भाषांवर जोर देण्यात येतो. सॉफ्टवेअर टेस्टिंग तसेच डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या पदांवर या कोर्समध्ये पदवीधर असलेल्या पदवीधरांना वार्षिक अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयटी कंपन्या तसेच सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
5- बीएससी इन डेटा सायन्स– बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमामध्ये डेटा विश्लेषण, एमएल आणि सांख्यिकीय मॉडेलिंग वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. डेटा अनालिस्ट, सायंटिस्ट किंवा बीआय ऍनालिस्ट म्हणून पदवीधरांना वर्षाला पाच ते दहा लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनालिटिक्स आणि एआय उद्योगांमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे.
6- बीएससी सॉफ्टवेअर– हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पद्धती तसेच कोडींग आणि प्रकल्प व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधरांना एका वर्षाला साडेतीन ते सात लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते.
7- बीएससी इन सायबर सिक्युरिटी– या अभ्यासक्रमामध्ये येथे एथीकल हॅकिंग आणि मॅनेजमेंट व नेटवर्क सेक्युरिटी इत्यादी विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. सायबर सुरक्षा तज्ञ, अधिकारी किंवा प्रवेश परीक्षक म्हणून पदवीधरांना एका वर्षाला चार ते आठ लाख रुपयांचे पॅकेज मिळते. सायबर सिक्युरिटी कंपन्या तसेच सरकार आणि फायनान्समध्ये या क्षेत्रातील उमेदवारांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत.