Pune Mahanagarpalika : पुणे महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण / एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.