Army Law College Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, या भरती अंतर्गत कोणती जागा भरली जाणार आहे? तसेच कधी मुलाखत घेतली जाणार आहे, जाणून घेऊया…
आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “वॉर्डन बॉईज वसतिगृह” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. लक्षात घ्या मुलाखतीस येताना अर्ज आणि कागदपत्रे सोबत आणावीत.
वरील पदांसाठी अर्जदार कमीत कमी पदवीधर असला पाहिजे, तसेच वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आणि माजी सैनिक असावा. ही भरती पुण्यात होत असून, उमेदवारांनी मुलाखतीसाठी आर्मी लॉ कॉलेज, पुणे, कान्हे कॅम्पस या पत्त्यावर 22 फेब्रुवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक प्रश्न असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://alcpune.com/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
-मुलाखत तारीख 22 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-तरी मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.