भारतामध्ये असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी यूपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या दरवर्षी विविध रिक्त पदांसाठी घेतल्या जातात
व त्या परीक्षांचे वेळापत्रक देखील केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येते. अगदी याच पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
त्यामुळे आता अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करता येणे खूप सोपे होणार आहे. या लेखात आपण याच परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा बघणार आहोत.
यूपीएससीने जाहीर केल्या 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा, वनसेवा, एनडीए, सीडीए, भू शास्त्रज्ञ अशा विविध परीक्षांच्या तारखा, त्या परीक्षांसाठी आवश्यक असलेली नोंदणी याबाबतची माहिती जाहीर केली असून त्यानुसार या परीक्षेच्या वेळापत्रक बघितले
तर 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025, भारतीय वन सेवा परीक्षा 2025 म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षा 2025 च्या एकत्रित नोंदणी करता येणार आहे. तसेच सदर परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. यामध्ये नागरी सेवा पूर्व परीक्षेतील जे उमेदवार यशस्वी होतील त्यांच्याकरिता 22 ऑगस्ट पासून नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 आयोजित केली जाणार आहे.
या आहेत नोंदणीच्या महत्त्वाच्या तारखा
एनडीए आणि नौदल अकादमी व सीडीए म्हणजेच समाईक संरक्षण सेवा परीक्षा 2025 साठीची नोंदणी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांची नोंदणी झालेली असेल त्या उमेदवारांची परीक्षा ही 13 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
एवढेच नाही तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी ची नोंदणी प्रक्रिया 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत करावी लागणार आहे व यासाठीची परीक्षा ही 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. तसेच चार सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत संयुक्त भू वैज्ञानिक पूर्व परीक्षा 2025 करिता नोंदणी करता येणार आहे व ही पूर्व परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे.