MMRDA Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर मुंबईत सध्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती MMRDA अंतर्गत सुरु आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पुढीलप्रमाणे :-
वरील भरती अंतर्गत “मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता जी.आर. मी / सहाय्यक अभियंता (सिव्हिल)” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने 18 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय अधिकारी, 8 वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास https://mmrda.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील पाठवायची आहेत, अर्ज 18 मार्च 2024 पर्यंत सादर आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचावी.