जॉब्स

NIA Recruitment 2024: नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1 लाख रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी

Published by
Ajay Patil

NIA Recruitment 2024:- विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठी तयारी करत असलेल्या तरुण-तरुणीकरिता एक सुवर्णकाळ असून शासनाच्या अनेक विभागांतर्गत विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येत आहेत.

त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचे सोने करण्याचा हा कालावधी आहे. अगदी याच मुद्द्याला धरून तुम्हाला देशाच्या नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एनआयएमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल

तर आता त्याकरिता पदवीधरांसाठी एक उत्तम संधी चालून आली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमध्ये 40 रिक्त पदांसाठी भरती

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली असून या भरतीच्या माध्यमातून स्टेनोग्राफर ग्रेड-1, असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क इत्यादी पदे भरली जाणार आहेत.

ही भरती 40 रिक्त पदांसाठी राबवली जात असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

 या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करतील ते पदवीधर असणे गरजेचे आहे.

 भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

 नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमध्ये भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

 किती मिळेल वेतन?

1- सहाय्यक( असिस्टंट )- या पदांमध्ये पे मॅट्रिक्समधील स्तर सहा अंतर्गत 35400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये दरमहा पगार मिळेल.

2- स्टेनोग्राफर ग्रेड-I- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल सहासाठी 35,400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये इतके वेतन मिळेल.

3- अप्पर डिव्हिजन क्लर्क पे मॅट्रिक्स मध्ये लेव्हल चार अंतर्गत 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये दरमहा वेतन मिळेल.

 ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा

पत्ता

 भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह योग्यरीत्या भरलेला अर्ज एसपी( प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,  नवी दिल्ली-110003 या ठिकाणी पाठवायचे आहेत.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून त्याची शेवटची तारीख ही दोन मार्च 2024 ही आहे.

 या भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट

https://nia.gov.in/ या वेबसाईटवर अधिकची माहिती मिळू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil