जॉब्स

12 वी पास आहात! तर इंडियन ऑइलमध्ये आहे उत्तम पगाराची नोकरी मिळवण्याची संधी,ताबडतोब करा अर्ज

Published by
Ajay Patil

खाजगी नोकरीच्या तुलनेत आज देखील मोठ्या प्रमाणावर तरुणाईचा कल सरकारी नोकरीकडे आपल्याला दिसून येतो. परंतु आता सरकारी नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी आहे. परंतु तरी देखील सरकारच्या माध्यमातून अनेक विभागांच्या रिक्त पदांच्या भरती करिता नोटिफिकेशन जाहीर करण्यात येतात.

यामध्ये अगदी दहावी ते बारावी पास असलेल्या उमेदवारांना देखील संधी उपलब्ध होते. अशाप्रकारे तुम्ही देखील बारावी पास असाल व सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

इंडियन ऑइल लिमिटेडने पब्लिक हेल्थ असिस्टंट या पदासाठी भरती करिता पत्रक काढले असून यासाठीचे अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

 काय आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता?

इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी बोर्डातून विज्ञान शाखेत बारावी पास असणे गरजेचे आहे.

यासोबतच उमेदवाराकडे कमीत कमी सहा महिन्यांच्या कालावधीचा कम्प्युटर डिप्लोमा/ प्रमाणपत्र असणे गरजेचे असून उमेदवाराला एमएस एक्सेल, एमएस वर्ड आणि एमएस पावर पॉइंट इत्यादींचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

 किती लागेल वयोमर्यादा?

इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे ते कमाल 30 वर्षाच्या दरम्यान असावे.

 कशी केली जाईल निवड?

इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड वॉक इन मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

 निवड झाल्यावर किती मिळेल पगार?

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड केली जाईल अशा उमेदवाराला 16640 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

1- या भरतीसाठी आवश्यक असलेल्या वॉक इन प्रॅक्टिकल/ कौशल्य चाचणी सह उपस्थित राहण्याकरता उमेदवाराला स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

2- यामध्ये कोणत्याही उमेदवाराला या चाचण्यांसाठी उपस्थित राहण्यासाठी ट्रॅव्हल अलाउन्स किंवा डीए दिला जाणार नाही.

3- उमेदवारांनी दिलेली कोणतीही खोटी/ बनावट/ चुकीची घोषणा/ माहिती/ तपशील किंवा कागदपत्रे/ दाखल केलेली प्रमाणपत्रे किंवा इतर कोणतीही गोष्ट प्रतिकूल अहवाल दिसून आला तर कोणत्याही टप्पा किंवा वेळेत कोणत्याही परिस्थितीत योग्य प्राधिकरणाकडून सत्यापित केले जाईल आणि याबाबत कारवाई केली जाईल.

4- इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून राबवण्यात जाणारी ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे.

 अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर ते oil-india.com या संकेतस्थळावर करू शकतात.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

इंडियन ऑइल लिमिटेडच्या माध्यमातून पब्लिक हेल्थ असिस्टंट पदासाठी राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil