ICMR-NIRRCH Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “शास्त्रज्ञ सी (वैद्यकीय)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
या जागांसाठी MBBS झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://nirrch.res.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,000/- इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज https://project.nirrch.res.in/ या लिंकद्वारे सादर करायचा आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.