अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात या वर्षी कलिंगडच्या लागवडीत मोठी घट झाली याचे प्रमुख कारण म्हणजे गत दोन वर्ष कोरोना मुळे कलिंगडाला बाजारपेठ मिळाली नव्हती.

जे खरेदीदार कलिंगड (Watermelon Farming) खरेदी करत होते ते देखील अतिशय कवडीमोल दरात कलिंगडची खरेदी करत होते.

यामुळे मागील दोन्ही वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना (Watermelon Growers) लाखोंचा तोटा सहन करावा लागला होता.

यामुळे या वर्षीदेखील गत दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि आपले नुकसान होऊ नये या हेतूने राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी (Farmers) कलिंगड लागवडीकडे पाठ फिरवली.

मात्र ज्या शेतकरी बांधवांनी कलिंगड लागवडीचे धाडस केले त्यांना सध्या मोठा फायदा मिळत आहे. कळमनुरी तालुक्याच्या मौजे सांडस येथील एका नवयुवक शेतकऱ्याला देखील कलिंगड लागवडीचा (Watermelon Cultivation) आता फायदा मिळत आहे.

मौजे सांडस येथील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कलिंगड लागवड सुरु केली आहे. कलिंगड हे हंगामी पीक अल्पकालावधीत काढण्यासाठी येत असल्याने आणि यासाठी उत्पादन खर्च देखील कमी असल्याने येथील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात या वर्षीदेखील कलिंगडाची लागवड केली.

खरिपातील (Kharip Season) पिकांची काढणी झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. राज्यात इतरत्र यावर्षी कलिंगडच्या क्षेत्रात मोठी घट झाली मात्र सांडस व आजूबाजूच्या परिसरात कलिंगड च्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

मौजे सांडस येथील शेतकऱ्यांनी तब्बल वीस एकर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे. यामध्येच नवयुवक शेतकरी गजानन धावंडकर यांनीदेखील कलिंगड लागवड केली, या शेतकऱ्याने आपल्या एक एकर बागायती क्षेत्रात कलिंगडची लागवड केली.

जानेवारी महिन्यात या नवयुवक शेतकऱ्याने कलिंगड लागवडीस सुरुवात केली होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कलिंगडची लागवड या शेतकऱ्याद्वारे केली गेली होती.

मागील अनेक वर्षांचा या नवयुवक शेतकऱ्याला अनुभव होता याचाच उपयोग करून या नवयुवक शेतकऱ्याने वॉटर सोल्युबल खतांचे व्यवस्थापन केले.

कलिंगड पिकाला योग्य ते पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करून कलिंगड चे यशस्वी उत्पादन घेतले. एक एकर क्षेत्रासाठी या नवयुवक शेतकऱ्याला जवळपास 65 हजार रुपयांचा खर्च आला.

कलिंगड उत्पादित केल्यानंतर या शेतकऱ्याचे कलिंगड दहा हजार पन्नास रुपये प्रति टन या दराने विक्री झाला. या शेतकऱ्याला एका एकरात तब्बल 19 टन उत्पादन मिळाले. म्हणजेच एक एकरात या शेतकऱ्याला जवळपास एक लाख 96 हजारांचे उत्पन्न मिळाले.

या नवयुवक शेतकऱ्याचे कलिंगड हे काश्मीरच्या कुलू बाजारपेठेत विक्रीसाठी गेले असल्याचा त्यांचा दावा आहे. अजूनही गजानन यांच्या शेतात काही कलिंगड शेष आहेत.

सध्या कलिंगडाला स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने यातून त्यांना अजून पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त कमाई होण्याची आशा आहे.