अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 maharashtra news :- मशिदीवरील भोंग्यांसंबंधी सध्या सुरू असलेल्या वादात आता करणी सेनेने उडी घेतली आहे. रात्री दहानंतर मशिदीवरील भोंगे वाजले तर,

करणी सेनेच्या कार्यकर्ते ते तोडून फेकून देतील, असा इशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये करणी सेनेचे महासंमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्यांनी या भोंग्यांच्यासमोर हनुमान चालिसाचे भोंगे लावण्याचा इशारा दिला. त्यानुसार अनेक ठिकाणी मनसेतर्फे तशी आंदोलने सुरू झाली आहेत. यामध्ये आता करणी सेनेची भर पडत आहे.