अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून, या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.(Karuna Munde)

एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी केली.

त्यासोबतच वेळप्रसंगी परळी येथून निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढील अडचणी वाढू शकतात.

करुणा मुंडे यांनी आल्या होत्या, यावेळी त्यांनी नगरमध्ये आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. ‘शिवशक्ती सेना’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करणार असल्याचे

स्पष्ट करीत भ्रष्टाचारमुक्त आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी केले. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्ष पाहिलेले आहे.

त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचे त्या म्हणाल्या. ३० जानेवारीला नगरमध्ये मोठा मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये पक्षाचे चिन्ह, झेंडा आणि बोधचिन्ह तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भातील आचारसंहिता जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.