Maharashtra news : अभिनेत्री केतकी चितळेला ॲट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजूर. ठाणे सत्र न्यायालयाकडून २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर.

या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी २१ जूनपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे.

केतकी चितळेविरोधात २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

मे २०२२ मध्ये मुंबईतील रबाळे पोलिसांनी तिला अटक केली होती.या गुन्ह्यात तिला जामीन मिळाला असला तरी पवार यांच्या विरोधातील गुन्ह्यासंबंधी दाखल अर्जावर २१ जूनला सुनावणी आहे.

या प्रकरणी तिच्याविरूद्ध केतकी चितळेविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीडमधील आंबेजोगई, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.