अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा सूर्यवंशी चित्रपट नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जवळपास 78 कोटींची कमाई केली आहे.

मात्र इतकी कमाई करूनही हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत खूपच खाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर 5 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिन दिवसात जवळपास 78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात 26 कोटी 38 लाख रुपयांची कमाई केली.

दुसऱ्या दिवशी 24 कोटी 53 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने तिन दिवसात एकूण 77 कोटी 24 लाख रुपयांची कमाई केली आहे’ या आशयाचे ट्वीट मनोबल यांनी केले आहे.