file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (रविवार) टी-२० वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. दोेन्ही संघ दुबईच्या मैदानात खेळण्यास सज्ज झाले आहेत.

टी-२० वर्ल्ड कपचा सर्वाधिक महत्त्वाचा आजचा दिवस आहे. दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट टीम आज संध्याकाळी एकमेकांना भिडणार आहेत.

त्यापूर्वी अनेक प्रश्न क्रिकेट फॅन्सच्या मनात आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे की या मॅचमध्ये करिती स्कोअर होऊ शकेल, टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय चांगला असेल की बॉलिंगचा, आणि अखेर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणती टीम मॅच जिंकेल.

नुकत्याच दुबीत पार पडलेल्या आयपेल सिझन २ च्या मॅचेसवरुन अंदाज बांधला तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देता येणे शक्य आहे. आयपीएल २०२१ च्या १३ मॅचेस दुबईत खेळवण्यात आल्या.

यातल्या फक्त चार मॅचमध्ये स्कोअर १४० रन्सच्या खाली होता. बाकी ९ मॅचेसमध्ये स्कोअर १४५ रन्सपेक्षा जास्तच होता. या मॅचमध्ये सर्वाधिक स्कोअर १९२ रन्स एवढा होता.

धोनीच्या चैन्नई सुपर किंग्रजने फायनलच्या वेळी हा रन्सचा डोंगर उभा केला होता. सर्वात कमी स्कोअर १११ रन्स होता. ज्या मॅचमध्ये आरसीबीच्या विरोओधात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला होता.

या काळात ७ मॅचेसमध्ये किमान एका टीमने १५० ते १७० स्कोअर उभा केला होता. या सगळ्याचा विचार करता आजच्या भारत-पाकिस्तान मॅचमध्येही १५० ते १७० स्कोअर होण्याची शक्यता आहे.