कृषी

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याच्या 3561 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले अनुदान ; अजून इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Published by
Ajay Patil

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत (Subsidy) खूपच चर्चा रंगली आहे. खरं पाहता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (Anudan) देण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला.

तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला होता. मात्र तद्नंतर नानाविध अडचणीमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करता आली नाही. मात्र आता सत्तेत आलेल्या नवोदित शिंदे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये अनुदान देण्यास प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.

50 हजार रुपये अनुदानाची पहिली यादी देखील सार्वजनिक झाली असून बहुतांशी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्यात अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या (Sangamner) 3,561 शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाचे कौतुक केले जात आहे. याबाबतची माहिती अहमदनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या जवळपास 18 हजार 651 शेतकरी बांधवांची नावे अनुदानासाठी पाठवण्यात आली होती. यापैकी पहिल्या यादीत 3561 शेतकऱ्यांची नावे आली असून त्यांना प्रत्यक्षात अनुदान देखील मिळाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार उर्वरित शेतकरी बांधवांना दुसर्‍या आणि तिसर्‍या यादीमध्ये समाविष्ट करून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो संगमनेर तालुका हा कर्जफेडीसाठी कायमच अव्वल राहिला आहे.

अशा परिस्थितीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलेले प्रोत्साहन अनुदान निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिवाळीच्या पर्वावर शासनाकडून भेट दिल्याचे सांगितले जात आहे.

Ajay Patil